जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास
निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध
लासलगाव : समीर पठाण
निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये या मागणीसाठी नांदूर मधमेश्वर धरण येथे आर्किटेक अमृता वसंतराव पवार यांच्या नेतत्वाखालील निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला तसेच या मागणीचे लेखी निवेदन अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे निफाड व येवला तालुक्यातील नागरिकांना अल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने निफाड व येवला तालुक्याचे हक्काचे पालखेड धरणाचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणा मार्गे जायकवाडी धरणात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी आर्किटेक अमृता पवार यांनी या वेळी केली.
या वेळी मिलन पाटील,अरुण आव्हाड,बाळासाहेब कुर्य, लहानु मेमाणे,रवींद्र आहेर यांच्यासह येवला तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच येवला निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने आमच्या मागणीचा विचार करून येवला निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जोरदार मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी या वेळी केली