काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन
नाशिक : प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि एसटी महामंडळच्या इंटक या संघटनेचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण राज्यात आपली ओळख निर्माण केलेले जयप्रकाश छाजेड यांचे काल रात्री निधन झाले,ते 76 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर सुयश रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने छाजेड कुटुंबावर शोककळा पसरली आहे, काँग्रेसच्या विविध पदांवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमठवला, एसटी कर्मचारी आणि कामगार यांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या इंटक या संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत होते, त्यांच्या पशच्यात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
छाजेड यांचे काही नातेवाईक दूर अंतरावरून येणार असल्याने त्यांचा अंत्यविधी आज ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी काँग्रेस भवन येथे ठेवण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.