महिलेचे अडीच लाखांचे दागिने लांबवले

 

 

दिंडोरी : अशोक केंग

पाॕलीश करुन देण्याच्या बहाण्याने सोन्याचे मंगळसुत्र बांगड्या व,कानातील टाॕप्स असा एकुण 2 लाख 40 हजाराचे सुवर्णलंकार महीलेची फसवणूक करुनपरागंदा झालैल्या दोन,अज्ञात संशयीत यांचे विरोधात दिंडोरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबबत माहीती अशी ,दिंडोरी येथील विजयनगरमधील गल्लीतील कृष्णाई बंगल्यात देशमुख कुटुंबिय वास्तव्यास आहेत शैला उत्तमराव देशमुख वय 62 ,यांचेकडुन सोन्याचे दागीने पाॕलीश करुन देतो अशी बतावणी करत पांढर्या रंगाचे शर्ट व काळ्या रंगाची पँट परीधान केलेल्या अंदाजे 40 ते 45 वर्ष वय असलेल्या अज्ञात इसम गळ्यात काळ्या लेदरची बॕगरंग सावळा ,चेहरा उभट ,केस काळेअंदाजे साडेपाच फुट उंची व दुसरा अंगात निळ्या रंगाचा शर्ट,काळ्या रंगाची जिन्स पँट,वय अंदाजे 40,रंग सावळा चेहरा गोल उंची अंदाजे साडेपाच फुट असे वर्णन असलेल्या दोन संशयीत यांनी सौ देशमुख यांचे शी संपर्क साधला व सोन्याच्या दागीन्याला पाॕलीश करुन देतो असे सांगुन साखरपेरणी संवाद साधला त्यांच्या अमिषाला देशमुख पडल्या व 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र असलेली दोन पदरी सोन्याची पोत ,1 लाख रुपये किमतीचे दोन तोळे वजनाच्या हातातील पाटली बांगडी ,30 हजार रुपये किमतीचे 6 ग्रॕम वजनाचे सोन्याचे कानातील टाॕप्स असे सुवर्णलंकार पाॕलीश साठी देभमुख यांचेकडुन घेतले.व पाॕलीशाचा बहाना करत सुवर्णलंकार घेऊन पोबारा केला.काही,वेळात देशमुख यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले तोपर्यंत अज्ञात यांनी कार्यभाग साधला दिंडोरी पोलीसात देशमुख यांनी तक्रारीच्या माध्यमातुन घटना कथन केली अज्ञात यांचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दिंडोरी पोलीसांनी दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *