मुंबई: हर हर महादेव चित्रपट पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले, हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली आहे, त्यामुळे ठाण्यातील विवान मॉल येथे जितेंद्र आव्हाड यांनी थेट मॉल मध्ये घुसून चित्रपटाचा शो बंद पाडला होता, यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती, याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आज जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतले, दरम्यान, याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी राज्यसरकार वर टीका करताना हे ब्रिटिश रान असल्याचे म्हटले,