वडाळा गाव: वार्ताहर
वडाळारोड भागातील जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत जेएमसीटी स्कुल संचालकांनी अचानक फी वाढ केल्याचा निषेध केल्याप्रकरणी पालकांनी पुर्व परवानगी शिवाय ठिय्या आंदोलन केले व रास्ता रोको करून रहदारीस अडथळा केला व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन केले नाही म्हणून, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सात जणांवर भा.दं.वि.क. ३४१, १८८, मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.