नाशिक : प्रतिनिधी
यापूर्वी पालिकेने खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी 31 मे पर्यत अंतिम मुदत दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत ही कामे झाली नाहीत. त्यामुळे पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले. खोदलेल्या रस्त्यांमुळे आताच नागरिकांची त्रेधातिरपट होत आहे. पावसाळ्यापूर्वी ही रस्ते सुरळीत केले नाहीतर नागरिकांच्या नाकीनउ येउन मोठया त्रासाला सामोरे जावे लागेल. पालिकेने लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून गॅस पाइपलाइनसाठी खोदलेल्या ओघळ्या दुरुस्तीचे काम सुरु असले तरी ते अंतिम झाले नाही. पालिकेने एकूण 246 किमी लांब रस्ते खोदाइसाठी एमएनजीएल कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यत 113 किमी लांबीचेच रस्ते खोदले आहेत. 10 मे पासून पुढील चार महिने खोदाइचे काम थांबवण्यात आले आहे. शहरातील नाशिक पूर्व व पश्चिम विभागात जेथे रस्ते खोदाइ करण्यात आले होते. तेथे खडीकरुन रस्ते दुरुस्ती केले जात आहे. मात्र काही ठिकाणी खोदलेले रस्ते चांगल्या पध्दतीने बुजवले नसल्याचा आरोप केला जातोय. केवळ मुरुम खडी टाकून काम सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. मान्सून चे आगमन कधीही होउ शकते. त्यामुळे पालिकेसमोर उर्वरीत चाळीस किमी लांबीचे रस्ते दुरुस्तीचे मोठे आव्हान असणार आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे हाल
एकीकडी एमएनजील गॅस कंपनीने खोदलेल्या रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट रस्त्यांसाठी नाशकात थेट रस्ते खोदून ठेवले आहे. या रस्त्यांचे काम अद्याप झालेले नसून या कामांना मुहूर्त लागणार कधी असे म्हणत नागरिक व व्यावसायिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. स्मार्ट सिटीला खोदलेले रस्ते दिसत नाही का असाही सवाल केला जातोय