नाशिक

खोदलेले रस्ते दुरुस्तीसाठी 15 जुन ची डेडलाइन



नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहरभर महानगर नॅचरल गॅस लिमीटॅड (एमनएनजीएल) कंपनीकडून पाइपलाइनासाठी खोदण्यात आलेले रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने 15 जुन ची डेड लाइन दिली आहे. शहरात 113 किमी चे रस्ते खोदण्यात आले होते. त्यापैकी 73 किमीचे रस्ते दुरुस्ती केली असून उर्वरीत 40 किमी रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. खोदलेल्या रस्त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्यास नाशिककरांचा मोठया त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पालिकेने खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी 31 मे पर्यत अंतिम मुदत दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत ही कामे झाली नाहीत. त्यामुळे पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले. खोदलेल्या रस्त्यांमुळे आताच नागरिकांची त्रेधातिरपट होत आहे. पावसाळ्यापूर्वी ही रस्ते सुरळीत केले नाहीतर नागरिकांच्या नाकीनउ येउन मोठया त्रासाला सामोरे जावे लागेल. पालिकेने लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून गॅस पाइपलाइनसाठी खोदलेल्या ओघळ्या दुरुस्तीचे काम सुरु असले तरी ते अंतिम झाले नाही. पालिकेने एकूण 246 किमी लांब रस्ते खोदाइसाठी एमएनजीएल कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यत 113 किमी लांबीचेच रस्ते खोदले आहेत. 10 मे पासून पुढील चार महिने खोदाइचे काम थांबवण्यात आले आहे. शहरातील नाशिक पूर्व व पश्चिम विभागात जेथे रस्ते खोदाइ करण्यात आले होते. तेथे खडीकरुन रस्ते दुरुस्ती केले जात आहे. मात्र काही ठिकाणी खोदलेले रस्ते चांगल्या पध्दतीने बुजवले नसल्याचा आरोप केला जातोय. केवळ मुरुम खडी टाकून काम सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. मान्सून चे आगमन कधीही होउ शकते. त्यामुळे पालिकेसमोर उर्वरीत चाळीस किमी लांबीचे रस्ते दुरुस्तीचे मोठे आव्हान असणार आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे हाल
एकीकडी एमएनजील गॅस कंपनीने खोदलेल्या रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट रस्त्यांसाठी नाशकात थेट रस्ते खोदून ठेवले आहे. या रस्त्यांचे काम अद्याप झालेले नसून या कामांना मुहूर्त लागणार कधी असे म्हणत नागरिक व व्यावसायिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. स्मार्ट सिटीला खोदलेले रस्ते दिसत नाही का असाही सवाल केला जातोय

Ashvini Pande

Recent Posts

पावसाळ्यात केसांची निगा

पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…

13 hours ago

आषाढी एकादशी उपवासाचे पूर्ण ताट

वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्‍याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…

13 hours ago

किचन ते कॉन्फरन्स रूम

भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…

13 hours ago

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…

14 hours ago

कृषी शिक्षण प्रवेशप्रक्रिया व संधी

शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…

15 hours ago

धोकादायक यशवंत मंडईवर हातोडा

मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…

15 hours ago