नाशिक

ई-केवायसीसाठी 30 जून अंतिम मुदत

जिल्ह्यात आठ लाख शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी बाकी

नाशिक : प्रतिनिधी
शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. शासनानेे 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही राज्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने अखेर शासनाकडून ई-केवायसीसाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, ज्या शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे, त्यांनी 30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण 38 लाख 73 हजार 305 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे पुरवठा विभागासमोर लक्ष्य होते. त्यांपैकी 30 लाख 42 हजार 101 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आठ लाख 31 हजार 204 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात एकूण 78 टक्केशिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

नवीन शिधापत्रिकांंधारकांची वाढ

गेल्या 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी प्रक्रियेसाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतीनंतरही अनेकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी होती. नवीन शिधापत्रिकाधारकांची वाढ झाल्याने त्यांचीदेखील ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे.

शिधापत्रिकांनी मेरा-केवायसी अ‍ॅप वापरावे
ई-केवायसी करण्यासाठी धान्य दुकानात गर्दी होत असल्याने शासनाने मेरा-केवायसी अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती भरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

ई-केवायसी करण्यासाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदत आहे. ज्यांची ई-केवायसी प्र्रक्रिया बाकी आहे त्या शिधापत्रिकाधारकांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
– कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago