जुने नाशिक भागात बिबट्याचे दर्शन वन्य जीव विभागाचे रेस्क्यू सुरू
वडाळा गाव: अफजल पठाण
वडाळारोडवरील हॉटेल साई प्रितमच्या पाठीमागील रहदारी परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराट निर्माण झाली आहे, याबाबत नागरिकांनी वन्यजीव विभागाला कळविल्याने परिसरात वनविभागाची धावपळ सुरू आहे.
नाशिक शहरातील वडाळा रोड वरील नागजी परिसरातील हॉटेल साई प्रितमच्या मागील रहिवाशी परिसरात काल रात्री १० : ३० वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन काही नागरिकांना झाल्याने खळबळ उडाली . घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने ग्रामीण भागाबरोबरच शहराच्या काही भागात धुमाकूळ सुरु आहे, त्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे, काल या भागात बिबट्या आल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती,