पंचवटी: प्रतिनिधी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी आज सभा झाली . निवडीच्या पार्श्वभूमीवर संचालक परदेश दौऱ्यावर गेले होते. काल त्यांचे आगमन झाले,
नाशिक बाजार समितीच्या सभापतीपदी पहिली महिला सभापती होण्याचा मान कल्पना चुंबळे यांना मिळाला आहे, निवडीनंतर चुंबळे समर्थकांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी केली.