भारतीय कांद्याला मागणी वाढणार असल्याने
कांदा उत्पादकांच्या आशा पल्लवित
लासलगाव; समीर पठाण
बांग्लादेश सरकारने कांदा आयात बंदी उठविली असल्यामुळे भारतीय कांद्याला मागणी वाढणार असून येत्या काही दिवसांत बांगलादेश कडून कांदा आयात सुरू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.त्यामुळे भारतीय कांदा उत्पादकांसाठी समाधान कारक बाब असल्याची माहिती राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी व्यक्त केली आहे
महाराष्ट्रातील कांद्याला कायमच बांगलादेश,श्रीलंका , इंडोनेशिया इत्यादी देशांकडुन भारतीय कांद्याची मागणी असते.सध्या रशिया,युक्रेन,श्रीलंका,इंडोनेशिया या देशात युद्ध सुरू असल्याने भारतीय कांद्याला प्रंचड मागणी असुनही निर्यातदार व्यापारी कांदा निर्यात करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.मधल्या काळात बांगला देशनेही भारतीय कांद्याला पंसती न देता त्यांच्या देशात उत्पादित मालाला प्रोत्साहन देणे पसंत केल्याने महाराष्ट्रातील कांदा निर्यात थांबली होती.महाराष्ट्रातील निर्यातदार व्यापाऱ्यांनी हजारो क्विंटल कांदा किसान रेल्वे व मालवाहू वहांनानी बांगलादेश सीमेपर्यंत नेउनही कांदा सिमापार होऊ शकत नव्हता त्यामुळे भारतीय कांदा निर्यातदार व्यापारी परेशान होते.नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक कांदा हा दररोज बाजारात ८० ते ९० हजार क्विंटल विक्रीसाठी येतो.तसेच नाशिक जिल्ह्यातून बांग्लादेशात कांदा सर्वाधिक जात असल्याने कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे.कांदा आयातीसाठी बांग्लादेशाने बंदी घातली होती.त्यामुळे दरात वाढ झाली नाही.मात्र बांग्लादेशात कांदा निर्यात सुरू झाल्यास काही प्रमाणात दरात वाढ होण्याची शक्यता राहिल असे मत येथील कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे
भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…
पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…
शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…
मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…
सभापती जगताप : बांगलादेशकडून अधिकृत घोषणाच नाही लासलगाव : वार्ताहर गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारकडून…
जिल्ह्यात प्रथमच ई-ऑफिस प्रणालीचा वापर नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी विकास विभागात आयुक्त लीना बनसोड…