नाशिक : प्रतिनिधी
पनवेलहून आलेल्या मालवाहू कंटेनर ला (MH 46 AF 7857) नाशिक मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाट्या जवळ शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली. ट्रकच्या समोरील भाग पूर्णपणे आगीत भस्मसात झाला आहे.सुदैवाने ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवीत हानी झाली नाही.यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
कंटेनर मधून धूर येऊ लागताच कंटेनर चालकाने तो उभा केला, स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते, सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले,
पहा व्हीडिओ