उदघाटनापूर्वीच करंजवन – मनमाड पाईपलाईन फुटली

उदघाटनापूर्वीच करंजवन – मनमाड पाईपलाईन फुटली
खेडगावजवळ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान..

मनमाड : आमिन शेख

मनमाड शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड(थेट पाईपलाईन) पाणी पुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन उद्घाटन होण्यापूर्वीच फुटली असुन यामुळे खेडगाव जवळील अशोक वाघ या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मनमाड नगर पालिका किंवा या योजनेचा ठेकेदार यांनी मला भरपाई द्यावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे.उद्घाटन पूर्वीच पाईपलाईन फुटल्याने मनमाड शहरातील नागरिकांना भविष्यात काय होईल असा प्रश्न पडला आहे.?अजून उद्घाटन झाले नाही तरी पाईपलाईन फुटली आता भविष्यात काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड शहरांसाठी महत्वपूर्ण असलेली व मनमाड शहराला पाणी टंचाईतुन मुक्त करणारी अत्यंत महत्वपूर्ण योजना म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड(थेट पाईपलाईन) पाणी पुरवठा योजना हा जवळपास साडे तीनशे रुपयांपेक्षा जास्त रकमेचा प्रकल्प अवघ्या दीड वर्षात पूर्णत्वास नेण्यात आला अद्यापही या योजनेचे अजून काही काम सुरू आहे उद्घाटन होण्यापूर्वी या योजनेचे तीन ते चार वेळा जलपूजन देखील झाले या पाणीपुरवठा योजनेच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या मात्र उदघाटन पुर्वीच खेडगाव जवळ असलेल्या शिंदवड गावातील अशोक वाघ या शेतकऱ्यांच्या शेताजवळुन जाणारी पाईपलाईन फुटली यात वाघ यांच्या शेतात लाखो लिटर पाणी गेले यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन मनमाड नगर परिषद किंवा सबंधित ठेकेदार यांनी मला भरपाई द्यावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे.उद्घाटन पूर्वीच पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यान मनमाड शहरातील नागरिकांनी या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असुन आताच असे तर भविष्यात काय …? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *