मनमाडला पाणी पुरवठा करणारी करंजवन योजना अद्यापही अपूर्णच

मनमाडला पाणी पुरवठा करणारी करंजवन योजना अद्यापही अपूर्णच

जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे आमदार कांदेवर गंभीर आरोप…

मनमाड : आमिन शेख

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी करंजवन पाणी योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असुन आम्ही करंजवन धरणात आरक्षण टाकण्यापासुन ते पंप स्टेशनला जागा खरेदी करण्यापर्यंत सर्व पद्मावती धात्रक सर्वपक्षीय नगरसेवक सर्व पत्रकार विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक यांच्यासह अनेक आंदोलनकर्ते यांच्या सहकार्यने केले आहे आता अर्धवट कामाचे जलपूजन करून श्रेय घेण्यासाठी तडफड सुरू आहे मात्र हे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे मुख्य जॅकवेल यासह विज कनेक्शन जोडलेला नाही मनमाड पालिकेवर वीजबिलाचा अतिरिक्त भार पडू नये म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार होता या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत तरीही केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनमाड शहरातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रकार आमदार कांदे यांच्याकडून होत आहे कथा वाचक प्रदीप मिश्रा यांनाही अंधारात ठेवून अर्धवट कामाचे जलपूजन केले आहे हे केवळ आणि केवळ निवडनुक डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे मात्र मनमाड शहरातील जनता हुशार आहे ती बरोबर उत्तर देईल असे आरोप शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख तथा महाविकास विधानसभेचे प्रमुख दावेदार गणेश धात्रक यांनी केले जिजाऊ भवन या त्यांच्या संपर्क कार्यलयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलते होते यावेळी संतोष बळीद यांनीही आमदार कांदे हे जनतेची दिशाभूल करत असल्याचे सांगितले यावेळी सुधाकर मोरे प्रमोद पाचोरकर माधव शेलार उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेश धात्रक म्हणाले की मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना अर्थात करंजवण मनमाड बाळासाहेब ठाकरे पाणीपुरवठा योजना व 72 खेडी पाणीपुरवठा योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मंजूर होऊन त्यांच्याच काळात त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे मुळात ही योजना तत्कालीन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यासह सर्वपक्षीय नगरसेवक शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटना पाणीपुरवठा योजनेसाठी आमरण उपोषण करणारे कार्यकर्ते पत्रकार या सगळ्यांच्या यशाची ही योजना आहे जर ही योजना खरोखरच पूर्ण झाली असेल आणि मनमाड शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरात रोज नळाला पाणी येत असेल तर आम्ही देखील या योजनेचे स्वागत करू मात्र अद्यापही बरेच काम बाकी आहे जनतेला बसेस भरून घेऊन गेले त्यावेळी संबंधित विभागाचे ठेकेदार इंजिनीयर यांच्यासह पालिकेचे कर्मचारी अधिकारी ही माहिती देण्यासाठी उपलब्ध होते मात्र त्यांना अर्धीच माहिती देऊन हॉटेलमध्ये जेवण करून माघारी आणण्यात आली. या गोष्टीची आम्हाला माहिती मिळाली आणि शहरातील ज्येष्ठ नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन आम्ही स्वतः कामाचा स्पॉट पंचनामा केला असता नको ती सत्य डोळ्यासमोर आली यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे धरणातून पाणी उपसण्यासाठी लागणारे जॅकवेलचे काम जॅकवेल पासून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन तसेच पाणी पंपिंग करण्यासाठी लागणारे विद्युत कनेक्शन देखील जोडलेले नाही या ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक पोल उभे आहेत मात्र त्यावर विद्युत वाहणाऱ्या तारा देखील जोडलेले नाही ही सर्व धुळफेक केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली जात आहे मनमाड शहरातील नागरिकांसह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिव महापुराण सांगणारे पंडित मिश्रा यांनाही अंधारात ठेवून त्यांच्या हस्ते या अर्ध्या कामाची जलपूजन करण्यात आले केवळ करंजवण योजना नाही तर तालुक्यातील अनेक अर्ध्या कामांचे लोकार्पण करण्यात आली आमदार कांदे यांनी योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांच्या नळाला पाणी आल्यानंतर जलपूजन केले असते तर आम्ही देखील विरोध केला नसता मात्र केवळ निवडणूक डोळ्यापुढे ठेवून जनतेच्या डोळ्यात धुळ फेक करण्याचे काम आमदार कांदे हे करत आहेत नांदगाव तालुक्यातील तसेच मनमाड शहरातील जनता हुशार आहे त्यांच्या या खोट्या भूलथापांना ते बळी पडणार नाही आम्हाला त्यांच्यासारखे राजकारण करायचे नाही चांगल्या कामाला आम्ही कधीही विरोध करत नाही फक्त एवढे सांगावेसे वाटते की श्रेय कोणीही घेऊ ही योजना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार यांनी दिलेली भेट आहे यासह 45 कोटी लोकवर्गणी भरण्याच्या वर्गात करण्यात येत आहे याचा आर्थिक बोजा मनमाड शहराच्या जनतेवर आगामी काळात पडेल यासह अनेक मुद्द्यांवर गणेश धात्रक यांनी प्रकाश टाकला जागेवर जाऊन काढलेले फोटो व्हिडिओ त्यांनी पत्रकारांना पुरावे म्हणून दिले यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद यांनी देखील आमदार कांदे यांचा समाचार घेत खडे बोल सुनावले शहरातील जनता सुज्ञ आहे ती त्यांना त्यांची जागा दाखवेल तसेच श्रेय वादाचं राजकारण शिवसेना कधीच करत नाही त्यांनी जर काम झाल्यानंतर जलपूजन केले असते तर आम्हीही काही बोललो नसतो मात्र जनतेला फसवण्याचे काम आमदार कांदे यांनी केले असल्याचे मत व्यक्त केले यावेळी नगरसेवक सुधाकर मोरे प्रमोद पाचोरकर शिवसेना शहरप्रमुख माधव शेलार यांच्यासह इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढवा जनता जागा दाखवेल..!
आमदार कांदे हे नांदगाव तालुक्यासह राज्यभरात मी इतकी हजार कोटीचे काम केले इतक्या हजार कोटीचे काम केले असे सांगत फिरत आहे मात्र स्वभावाप्रमाणे कूटनीती वापरून धाकधडपशाही व इतर अनेक पद्धतीने ते इतर पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्ते नेते यांना धाकात ठेवत आहे जर त्यांनी इतके विकास कामे केले आहेत तर धाक दडपशाही न करता विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढवावी तालुक्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल

श्रेय कोणी घेऊ काम आम्ही केल्याचा मनस्वी आनंद
मनमाड शहरासाठी करंजवण मनमाड तसेच बहात्तर खेडी योजना या दोन्हीही योजना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मंजुरी तसेच प्रशासकीय मान्यता देऊन वर्क ऑर्डर करण्यात आल्या होत्या मात्र आमदार कांदे यांना माहिती होते आपण गद्दारी करणार आहोत यामुळे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा तत्कालीन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक व इतरांना जाऊ नये यासाठी चार ते पाच महिने उशिराने निविदा काढल्या मात्र सत्य जनतेपासून लपत नाही ते आज ना उद्या समोर येते जसे आज आले आहे यामुळे श्रेय कोणीही घेऊ आम्ही सर्वांनी काम केल्याचा मनस्वी आनंद आहे

 

Bhagwat Udavant

Recent Posts

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…

3 hours ago

शिंदे टोलनाक्यावर कारला आग

शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…

5 hours ago

मनपा आयुक्त पदाबाबत मोठा ट्विस्ट, कार्डिलेची बदली रद्द, मनीषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…

10 hours ago

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…

14 hours ago

नाशिक मनपा आयुक्तपदी राहुल कर्डीले

नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…

2 days ago

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…

2 days ago