महाराष्ट्र

आता कारवाईची वेळ!

आता कारवाईची वेळ!
शहरात दुचाकी, चारचाकी वाहनचोरी, घरफोडीसह भरदिवसा चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील महिन्यात नाशिक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेले जयंत नाईकनवरे यांना आता खर्‍या अर्थाने रस्त्यावर उतरून पोलिसिंग करण्याची गरज आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना एखादा गंभीर गुन्हा घडण्यापूर्वी व घडल्यानंतर काय करावे, याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार काही पोलीस कारवाई करतात. त्या तुलनेत शहरातील 12 पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला असता, नागरिक तथा पीडित महिलांनी एखादा गुन्हा होण्यापूर्वीच तक्रार दिलेली असते. मात्र, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे दिसून आले. हाणामारी, लूटमार, हुंडाबळीसह इतर गंभीर गुन्हे घडल्यानंतर अनेकदा पोलीस आर्थिक लाभापोटी आरोपीशी हातमिळवणी करत असल्याचे गेल्या काही दिवसांतील लाच प्रकरणांवरून दिसून आले आहे. परिणामी, शहरात पोलीस दलाची प्रतिमा खालावत आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसह गुन्ह्याची उकल वेगाने केली तर शहरात रक्तपात वाढणार नाही. तरुणाई भाईगिरीकडे वळणार नाही. क्षुल्लक व किरकोळ कारणांनी खुनाच्या घटनांनी शहर हादरत आहे. चेन स्नॅचिंग, घरफोडी, खून, सोनसाखळी, वाहनचोरी आदी गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. स्मार्ट पोलिसिंग करणार्‍या पोलिसांनी यात सुधारणा केली नाही तर शहरात आणखी रक्तपात वाढून गुन्हेगारी डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चोरट्यांनी लग्नसोहळ्यात येणार्‍या महिलांना लक्ष्य केल्याच्याही अनेक घटना घडत आहेत. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी नागरिकांना थेट भेट घेण्यासाठी आपले दालन सोमवारी ते शुक्रवार सायंकाळी 4 ते 5 पर्यंत खुले केले आहे. त्यामुळे नागरिक थेट आयुक्तांशी संवाद साधत असले तरी पोलीस आयुक्तांनी नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे. पोलिसांची नाकाबंदी, गस्त, पेट्रोलिंग तसेच कोम्ंिबग, तडीपारीच्या कारवाईची गरज आहे.

अमोल सोनवणे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

12 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

13 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

13 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

13 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

13 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

13 hours ago