मुकणे : प्रतिनिधी कावनई शिवारातील मुकणे ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव यांच्या आई अनुसयाबाई यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे डाग वाहनधारक चोरट्यांनी दिवसाढवळ्या गळ्यातुन ओढुन पळवल्याची घटना काल रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली . याबाबतचे सविस्तर वृत्त असे की , मुकणे येथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव व त्यांचे कुटुंब कावनई रोडवरील वाघोबावाडी व बळवंतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतावर राहत असुन तेथे त्यांचे किराणा दुकान आहे .
काल रविवार दुपारी घरी कोणी नसल्याने त्यांची आई अनुसयाबाई कचरू राव या दुकानावर थांबल्या होत्या याच दरम्यान दुपारी दीड वाजेच्या दरम्यान दोन जण मोटारसायकलवरून आले व बिस्कीटपुडे घेण्याच्या बहाण्याने एकजण दुकानावर गेला व एकजण गाडीवरच थांबुन होता याच वेळी अनुसयाबाई यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या पोथी ( अंदाजे किंमत २ लाख ) गळ्यातुन हिसकावून दोघांनीही गाडीवरून पलायन केले.
त्यांनी आरडाओरडा केला मात्र मोटारसायकलवरून दोघेही पसार झाले या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असुन श्रीक्षेत्र क कावनई जवळच असल्याने या रस्त्यावर नेहमीच काहीशी वर्दळ असते . परिसरात महिलांच्या गळ्यातून सोने चोरीच्या घटना वाढत असुन घोटी पोलिसांनी याकडे लक्ष देऊन सदर घटनांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे .
हेही वाचा : महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांचा पोबारा
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…