नाशिक : प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत काल (दिं 22) रोजी कावळ्याचं शेणाचं हे नाटक सादर करण्यात आले.नाटकातून सामाजिक विषमतेवर भाष्य करण्यात आले आहेत. समसमान बलाबल असूनही व्यवस्थेने प्रस्थापितांना उच्च असे स्थान दिले. तर विस्थापितांना सतत आपल्या न्याय हक्कासाठी प्रस्थापितांसोबत लढावे लागते आणि स्वतःला सिद्ध करावे लागते. वर्षांनुवर्षे समाजात रुजलेली ही विषमता आताही आहे. पण या विषमतेविरूद्ध प्रस्थापितांशी लढून स्वतःला सिद्ध केले जाते आणि प्रस्तापिताकडून अस्तित्वासाठी वारंवार समाजात गरीब श्रीमंत , उच्च निच्च, अशी दरी निर्माण करत विस्थापितांचे अस्तित्व पुसण्यासाठी प्रयत्न केले जातात.हे नाटकातून मांडण्यात आले आहे.
नाटकाच्या शीर्षकातच कावळा हा विस्थापिताचे प्रतिनिधीत्व करतो हे अगदी मार्मिकरित्या कावळा चिमणी गोष्टीवरून दाखवण्यात आले आहे.
नाटकाचे लेखन अशोक कांबळी ,दिग्दर्शन जयदीप पवार,नेपथ्य पियुष भांबळ , संगीत राहुल कानडे, प्रकाश योजना जयदीप पवार, पार्श्वसंगीत राहुल कानडे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा कविता देसाई, रंगमंच सहाय्य उत्कंठा नाट्य संस्थेतील कलावंतानी केले आहे. नाटकात शुभम धांडे, दिनेश पवार, सिद्धी बोरसे , राहुल बर्वे , वैष्णवी मेटकर , साक्षी बनकर, हर्षल जोशी, करण राजपूत सनी शंखपाळ ,अनिकेत महाजन ,आदित्य तांबे ,सीमा पाठक, राहुल पाटील ,चिराग चव्हाण, रुद्राक्ष गायकवाड, संस्कृती पवार ,आजचे शिरोडे, हर्ष मांडगे यांनी अभिनय केला.
आज सादर होणारे नाटक : एशक का परछा -नाट्यसेवा थिएटर्स, नाशिक