नाशिक : प्रतिनिधी
अभिनेत्री केतकी चितळेंनी शरद पवार यांच्यावर टिटवर पोस्ट करत खालच्या पातळीवर टीका केली. या टीकेचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे.तर अभिनेत्री केतकी चितळे ला पोलिसांनी वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अटक ही केली.मात्र याच वादग्रस्त पोस्टवर कारवाई करावी या मागणीसाठी नाशिक राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांनी केतकी चितळे विरोधात नाशिकमध्ये सायबर सेलकडे तक्रार केली असून पोलिसांनी तिच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.