खड्डा चिकनची शहरात वाढती क्रेझ

खवय्यांना सी फूड ची मेजवानी नववर्षाची धूम

नाशिक ः प्रतिनिधी
वर्षाअखेर साजरी करतांना खवय्यांनी हटके चमचमीत पदार्थांवर ताव मारण्याचे बेत आखले आहेत. थर्टीफस्टला व्हेजसह नॉनव्हेज विविध पदार्थांना मागणी असते.गेल्या काही वर्षापासून चुलीवरील पारंपरिक पदार्थांनी नाशिककरांना भूरळ घातली आहे.खड्डा चिकन हा त्यातीलच एक प्रकार लोकप्रिय होतांना दिसत आहे.शेकोटीत खड्डा करून चिकनला मसाला लाऊन भाजले जाते.तेलाशिवाय पारंपरिक मसाला यात वापरून शिजविण्यात येणारे चिकन आणि इतर सी फूडला पसंती मिळत आहे.

 

पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन

 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात खड्डा कोंबडी नावाने डिश केली जाते.संस्कृती आणि खाद्यपरंपरा या कधीही वाखाणण्यासारखे आहे. तेल न लावता अगदी नैसर्गिक पद्धतीने खड्डा कोंबडी शिजवली जाते.निखारे असलेल्या या खड्‌ड्यांमध्ये चिकन ठेवले जाते. तेलाचा वापर करण्यात येत नाही.  लोखंडी जाळी ठेवली जाते. त्यावर वरून गरमागरम पेटलेली लाकडे यावर टाकण्यात येतात. कोंबडीच्या जातीनुसार तिला अर्धा ते एका तास निखार्‍यावर शिजविण्यात येते. निखारे राख काढून वाफाळलेली विना तेलाचे हे चिकन पीस तोंडाला पाणी आणतात.

 

नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू….

 

 

शहरातील अनेक ठिकाणच्या हॉटेल्स्‌,ढाबे टपरीवजा हॉटेल्स्‌मध्ये मांसाहाराचे विविध प्रकार करून खाद्यप्रेमींना मेजवानीचे बेत आयोजन केले आहेत.सी फूड विविध प्रकारचे मासे,कोळंबी चिकन मटणासह बाजरी,ज्वारीच्या भाकरी,नॉनव्हेज थाळी प्रकाराला पसंती मिळत आहे.

नववर्ष स्वागतासाठी खवय्यांना हटके पदार्थांची चव चाखण्यास मिळणार आहे.स्टार्टर्स पासून मेन कोर्स पर्यत वेगवेगळे पदार्थ थर्टीङ्गस्टमुळे ठेवण्यात आले आहे.मागील दोन वर्ष कोरोनामुळे मुक्तपणे हॉटेलींग आणि पर्यटन नागरिकांना करता आले नव्हते.यंदा उत्साह जोरोत असल्याने  सी फूडकडे कल वाढलेला आहे.त्याशिवाय पारंपरिक पद्धतीने बनविलेले चिकन,मटण इतर सी फूडची मागणी केली जात आहे.
दीपक जीना(हॉटेल व्यावसायीक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *