खवय्यांना सी फूड ची मेजवानी नववर्षाची धूम
नाशिक ः प्रतिनिधी
वर्षाअखेर साजरी करतांना खवय्यांनी हटके चमचमीत पदार्थांवर ताव मारण्याचे बेत आखले आहेत. थर्टीफस्टला व्हेजसह नॉनव्हेज विविध पदार्थांना मागणी असते.गेल्या काही वर्षापासून चुलीवरील पारंपरिक पदार्थांनी नाशिककरांना भूरळ घातली आहे.खड्डा चिकन हा त्यातीलच एक प्रकार लोकप्रिय होतांना दिसत आहे.शेकोटीत खड्डा करून चिकनला मसाला लाऊन भाजले जाते.तेलाशिवाय पारंपरिक मसाला यात वापरून शिजविण्यात येणारे चिकन आणि इतर सी फूडला पसंती मिळत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात खड्डा कोंबडी नावाने डिश केली जाते.संस्कृती आणि खाद्यपरंपरा या कधीही वाखाणण्यासारखे आहे. तेल न लावता अगदी नैसर्गिक पद्धतीने खड्डा कोंबडी शिजवली जाते.निखारे असलेल्या या खड्ड्यांमध्ये चिकन ठेवले जाते. तेलाचा वापर करण्यात येत नाही. लोखंडी जाळी ठेवली जाते. त्यावर वरून गरमागरम पेटलेली लाकडे यावर टाकण्यात येतात. कोंबडीच्या जातीनुसार तिला अर्धा ते एका तास निखार्यावर शिजविण्यात येते. निखारे राख काढून वाफाळलेली विना तेलाचे हे चिकन पीस तोंडाला पाणी आणतात.
नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू….
शहरातील अनेक ठिकाणच्या हॉटेल्स्,ढाबे टपरीवजा हॉटेल्स्मध्ये मांसाहाराचे विविध प्रकार करून खाद्यप्रेमींना मेजवानीचे बेत आयोजन केले आहेत.सी फूड विविध प्रकारचे मासे,कोळंबी चिकन मटणासह बाजरी,ज्वारीच्या भाकरी,नॉनव्हेज थाळी प्रकाराला पसंती मिळत आहे.
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…