खादीची क्रेझ कायम, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड

खादीची क्रेझ कायम, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड

गांधी जयंती विशेष : सूट असल्यावर खादी उत्पादनांच्या मागणीत वाढ

नाशिक ः देवयानी सोनार
पुढारी आणि उच्चभ्रु वर्गाची एकेकाळी पसंत असलेली खादी आज तरुणांमध्येही लोकप्रिय होताना दिसत असली तरी खादीची क्रेझ केवळ फॅशनपुरतीच उरली आहे. सातत्याने खरेदी होण्यासाठी ब्रॅण्डींग होण्याची गरज आहे. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे गेल्या काही वर्षांत खादीचा बराच बोलबाला आहे.
पूर्वी पुढारी किंवा उच्चभ्रु लोकच खादीचे कपडे वापरण्यास पसंती देत होते.परंतु खादी आता तरुणाईमध्येही तितकीच लोकप्रिय होतांना दिसून येते. खादी कपड्यात पारंपरिकतेबरोबर आधुनिकतेची जोड दिली आहे. त्यामुळे रंगसंगतीचा विचार करून कापडाचा पोत निरनिराळ्या डिझाईन आणि प्रकार उपलब्ध झाले आहेत. तरुणाईमध्ये खादीची क्रेझ आहे.त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून खादीला पसंती मिळत आहे. स्वदेशी खादी वापरण्यावर देशप्रेमही दिसून येते. आरामदायक,स्टायलीश पेहराव म्हणूनही पसंती मिळत आहे.
नेहरू शर्ट, बुश शर्ट मोदी शर्ट जॅकेट पायजमा धोतर, शोल्डर बॅग साड्या ड्रेस मटेरियल यांना विशेष मागणी असते. टॉवेल, पंचे रुमाल, आसन सतरंजी, लोकर घोगडी कापड,कॉस्मेटिक उत्पादने यांनाही मागणी असते. साडी आणि ड्रेस मटेरियलला विशेष मागणी नाही. नावीण्यात सातत्य नसल्याने बाजारात अनेक प्रकार असले तरी खादी ग्रामोद्योगच्या  पारंपरिक कपड्यांना मागणी कमी आहे.
बनावट उत्पादने बाजारात
खादी नाव जोडून इतर उत्पादने, सौंदर्य प्रसाधने शहरात विकले जात आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो आहे. नाशिक जिल्ह्यात एकमेव दुकान गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. 1951सालापासून खादी उत्पादने बाजारात आणले आहे. ग्रामोद्योग उत्पादनामध्ये सौंदर्य प्रसाधनांना मागणी वाढत आहे.
खादीचा वापर जुने लोक जास्त करीत होते. तरुणांमध्ये खादी फॅशन म्हणून वापरली जाते लिनन, कॉटनकिंग असे ब्रँड वापरले जातात तसे खादीही संग्रही असावी म्हणुन वापर केला जात आहे. त्यामुळं खादीची मागणी कमी जास्त होत असते
सुटमुळे नवीन ग्राहक तयार
वर्षातून दोन ते तीन वेळा दहा ते 45 दिवसांची सूट दिली जाते त्यामुळे नवीन ग्राहक वाढण्यास मदत होते. महिती असणारे नागरिकही आवर्जून याच काळात खरेदी करतात दिवाळी याचं हंगामात येतं असल्याने चागलं प्रतिसाद असतो.
उपक्रमांना ब्रेक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या काळात अनेक उपक्रम राबविण्यात आले होते शेण,गोमुत्रपसून रंग वैगरे उपक्रम हाती घेण्यात आले होते आता या उपक्रमांना ब्रेक लागला आहे.
गांधी जयंती ते नेहरू जयंतीपर्यंत 45 दिवस दहा टक्के सूट दिली जाते वर्षातून तीन ते चार वेळेला दहा दिवस ते आणि 45 दिवस सूट दिली जाते त्यामूळे नागरिकांना सुट असल्याचे माहिती असते तेव्हाच खादी ग्रामोड्याग मधे विविध उत्पादने घेण्यासाठी गर्दी करतात. यंदा हर घर तिरंगा उपक्रमामुळे ध्वजाची कमतरता निर्माण झाली नागरिकांनी एक ऐवजी दोन तीन ध्वज खरेदी केल्याने तुटवडा निर्माण झाला होता.
विजय शेलार
व्यवस्थापक नाशिक जिल्हा  सहकारी  खादी ग्रामोद्योग संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *