शंकर महादेवन, होममिनीस्टर कार्यक्रम ठरणार प्रमुख आकर्षण
नाशिक : प्रतिनिधी
खानदेशची वैभवशाली परंपरा जपणारा खानदेश महोत्सव येत्या 22 ते 25 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, ठक्कर डोम येथे होणार्या या महोत्सवात खाद्य जत्रेसह पुरस्कार वितरण, संगीत रजनी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार सीमा हिरे, रश्मीताई हिरे-बेंडाळे यांनी दिली. महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेने खान्देशची सांस्कृतिक, सामाजिक, अशी स्वतंत्र ओळख आहे. खानदेशची कृषी संस्कृती, खाद्य संस्कृती, वेगळी आहे. येथे प्राचीन परंपरा आहे. याठिकाणची संस्कृती, कला, साहित्य, खाद्यपदार्थ याबरोबरच येथील माणसांनी जपलेले सांस्कृतिक वैभवास व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खान्देश महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
येत्या 22,23,24,25 डिसेंबर रोजी हा महोत्सव होणार आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी सिडको भागातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत पारंपारिक नृत्य, कानबाई उत्सव, गोंधळी नृत्य, लेझीम पथक, डोंगर देव, तसेच खान्देश संस्कृतीचे दर्शन घडविणा-या प्रतिकृती, विविध वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी, पारंपारिक वाद्याच्या गजरात ही शोभायात्रा निघणार आहे. महोत्सवामध्ये विविध शासकीय विभाग, शासकीय कार्यालये, निमशासकीय विभाग यांचे कृषी, पर्यटन, पुरातत्व विभाग आदी माहितीपर स्टॉल्स, खान्देश प्रदेशाला एक विशिष्ट ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
खान्देश मधील किल्ले, लेण्या, ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक ठिकाण पर्यटन स्थळे याबाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. लोक कला, होम मिनिस्टर असे सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम होणार आहे तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील अनेक उद्योजक.. सामाजिक कार्यकर्ता..चांगले सरकारी अधिकारी, क्रीडापटू अशा विविध स्तरातील गुणवंतांचा खान्देश रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. स्टॉल बुकिंग साठी संपर्क 9423541662/8888818143 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आयोजक आमदार सीमाताई हिरे व रश्मीताई बेंडाळे – हिरे यांनी सांगितले.
असे होणार कार्यक्रम
दिनांक 22: सकाळी 8 वाजता खान्देशनी शोभायात्रा
अहिराणी साहित्य व कवी संमेलन
दिनांक 23 : सकाळी महिलासाठी भजन स्पर्धा
संध्याकाळी न्यू होम मिनिस्टर चला पैठणी जिंकूया व फॅशन शो
दिनांक 24 : सकाळी टॅलेंट शो व डान्स कॉम्पिटिशन
संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला व लावणी महोत्सव
दिनांक 25 : संध्याकाळी शंकर महादेवन यांचा कार्यक्रम
खानदेश रत्न पुरस्कार वितरण सोहळा
यांचा होणार खान्देश रत्न पुरस्काराने सन्मान
विशेष पुरस्कार : सी. आर. पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष, गुजरात
विजय नामदेवराव सुर्यवंशी (राज्य उत्पादन शुल्क आयुक्त महाराष्ट्र)
दिलीप केदारनाथ कोठावदे (131 वेळा रक्तदान)
शाहु सहदेवराव खैरे ( संस्कृती नाशिक)
कुंदा बच्छाव शिंदे (आदर्श शिक्षिका)
बुधाजी शंकर पानसरे (कामगार ते यशस्वी उद्योजक)
मनोज केशव कोतकर (नंदन स्वीटस), सत्यजीत बच्छाव (क्रिकेटर रनजी पटू) बाळासाहेब घुगे (अपंग संघटना) संजय नाना धोंडगे महाराज (निरुपणकार)रायमा रज्जाक शेख (पिहू) सागर मटाले टीम