पुन्हा चूक होता कामा नये; जिल्हाधिकार्यांना इशारा
नाशिक : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या रविवारी (दि. 1) जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक घेत अमृतस्नानाच्या तारखा घोषित केल्या. दरम्यान, या बैठकीचे निमंत्रण नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना न दिल्याने याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने संतप्त होत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदत दिले. पुन्हा अशी चूक होता कामा नये, असा इशारा दिला. खासदार वाजे ज्या नाशिकचे प्रतिनिधित्व करतात तेथे देशातील सर्वोच्च सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्याद़ृष्टीने ज्या बैठका होतील त्यात त्यांना निमंत्रण देणे आवश्यक आहे. मात्र, वाजे यांना डावलून समस्त नाशिककरांचा अवमान प्रशासन करत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, या बैठकीला नाशिक लोकसभा मतदारसंघाचे सदस्य राजाभाऊ वाजे यांना निमंत्रण देणे क्रमप्राप्त होते. खासदार वाजे शिवसेना ठाकरे गटाचे असल्यामुळे पक्षपातीपणा केला जात असल्याचे वाटत आहे.सिंहस्थ कुंभमेळा नाशिक लोकसभा मतदारसंघात होतो. या मतदारसंघाचे वाजे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र, कुंभमेळ्याच्या बैठकीला बोलावले जात नाही. यावरून प्रशासनाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना जाणीवपूर्ण डावलण्याचे काम होत असून, मतदारसंघातील मतदारांचा हा अवमान आहे. पण शिवसेना कदापि हे सहन करणार नाही. पुढील सिंहस्थ नियोजन बैठकीत आमच्या लोकप्रतिनिधींना विसरता कामा नये, याची वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवसेना उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, राज्य संघटक विनायक पांडे, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, कोअर कमिटी सदस्य केशव पोरजे, भारती ताजनपुरे, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, मामा राजवाडे, गुलाब भोये, अस्लम मनियार, दिलीप मोरे, शिवसेना विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, राहुल दराडे, सुभाष गायधनी, सचिव मसूद जिलानी, महानगर संघटक सचिन बांडे, देवा जाधव, महानगर समन्वयक शैलेश सूर्यवंशी, शिवसेना पदाधिकारी ऋषी वर्मा, सुभाष शेजवळ, गोरख वाघ, सुनील जाधव, वीरेंद्र टिळे, नीलेश साळुंके, रवींद्र गामणे, संजय पिंगळे, नितीन जाधव, मनोज जाधव यांच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी कीर्ती निरगुडे, शोभा पवार, योगिता गायकवाड, सुवर्णा काळुगे, शोभा वाल्डे, नीलोफर शेख, माधुरी पाटील, शारदा सपकाळ आदी उपस्थित होते.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…