अभिनेता क्रांतीनाना मळेगावकरसह टीव्ही स्टार बालगायिका सह्याद्री मळेगावकरची उपस्थिती
नाशिकरोड : प्रतिनिधी
जेलरोड येथील जुना सायखेड रोडवरील गणेश व्यायाम शाळे समोरील मैदानात सर्वज्ञ सोशल फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने खास महिलांसाठी भव्य हळदी कुंकू सोहळा व न्यू होम मिनिस्टर “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक 23 व परिसरातील महिलांसाठी शनिवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजता जुना सायखेडा रोडवरील गणेश व्यायाम शाळे समोरील मैदानात न्यू होम मिनिस्टर “खेळ रंगला पैठणीचा” व भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून यात अनेक बक्षिसे खेळात भाग घेणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर, टीव्ही स्टार बालगायिका सह्याद्री मळेगावकर उपस्थित राहणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलां महिलांसाठी पहिले बक्षीस सॅमसंग कंपनीचा 32 इंची स्मार्ट टीव्ही व मनाची पैठणी, द्वितीय बक्षीस सॅमसंग कंपनीचा फ्रिज व मानाची पैठणी, तृतीय बक्षीस वॉशिंग मशीन व पैठणी, चतुर्थ बक्षीस स्मार्टफोन, पाचवे बक्षीस शिलाई मशीन, सहावे बक्षीस गॅस शेगडी, सातवे बक्षीस मिक्सर, आठवे बक्षीस टेबल फॅन, नववे बक्षीस डिनर सेट व दहावी बक्षीस इस्तरी असे असून प्रश्नमंजुषा मधील दहा महिलांचे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे व त्यांना आकर्षक असा डिनर सेट भेट देण्यात येणार आहे. तरी महिलांनी मोठ्या संख्येने या पक्षांची लयलूट करण्यासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक कार्यक्रमाचे आयोजक विशाल संगमनेरे यांनी केले आहे.
सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…
*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…
सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…