खंडणीसाठी केले होते अपहरण
सिन्नर : प्रतिनिधी
येथील वावी वेस परिसरातून गुरुवारी (दि.5) सायंकाळी 7.10 च्या सुमारास अपहरण झालेल्या 10 वर्षीय मुलगा सुखरूप घरी परतला असून रात्रीच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी स्वतः मुलाला घराजवळ आणून सोडले.
चिराग तुषार कलंत्री (12) रा. काळे वाडाशेजारी, वावी वेस सिन्नर हा बालक आपल्या मित्रांसोबत सायंकाळी काळे वाड्या समोरील मोकळ्या जागेवर खेळत असताना सफेद रंगाच्या ओमिनी कारमधून आलेल्या काही इसमांनी चिरागला ओढून गाडीत टाकत पळ काढला.
त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरीकांनी ओमिनीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओमिनी सुसाट वेगाने सिन्नर नगर परिषदेसमोरून फरार झाली. त्यातील दोन इसमांनी काळ्या रंगाची पॅन्ट व डोक्यात गुलाबी रंगाची टोपी व तोंडाला काळ्या रंगाचे मास्क घातलेले होती.
यानंतर परिसरातील नागरिकांनी चिरागच्या आई-वडिलांसह समाज बांधवांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे पोलीस ठाण्यात एकच गर्दी झाल्याचे बघायले मिळाले होते. अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगने, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनीही तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कांगने यांच्या सूचनेनुसार जिल्हाभरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. सिन्नर पोलिसांनी आपली पथके रवाना करत त्याचा शोध सुरू केला होता. मात्र, रात्री 1.30 च्या सुमारास अपहरणकर्त्यांनी स्वःत चिरागला दुचाकीवर त्याच्या घराजवळ आणून सोडल्याने कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला.
असा घडला प्रकार
चिराग मित्रांसोबत खेळत असताना ओमिनीमधून आलेल्या 2 ते 3 जणांनी चिरागला कारमध्ये टाकून शिर्डी महामार्गाने खोपडी परिसरात नेल्याचे स्वःत चिरागने सांगितले. त्यांनतर तिथून दोघांनी चिरागच्या डोळ्याला पट्टी बांधून दुचाकीवरून बारागाव पिंप्री शिवारात नेले. तेथे जाऊन चिरागला त्यांनी पिण्यासाठी पाणी देऊन त्यास जॅकेट घालण्यास दुचाकीवर चिरागला मध्ये बसवून मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर पोस्ट ऑफिसजवळ आणून सोडले. घाबरलेल्या चिरागने घरी येत घडलेला सर्व प्रकार कथन केला.
१) रोशन नंदु चव्हाण, वय २३, २) यश संदिप मोरे, वय २२, दोन्ही रा. कानडी मळा, सिन्नर, ता. सिन्नर यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचा साथीदार नामे ३) आकाश भास्कर दराडे, रा. खोपडी, ता. सिन्नर याचे सोबत केल्याची कबुली दिली. सदर गुलावे वडील है। सिन्नर शहरातील मोठे व्यापारी असून त्यांचेकडे भरपूर पैसा आहे. त्यांच्या मुलाचे अपहरण केल्यास आपल्याला पाच दहा लाख रूपये आरामात मिळून जातील असा विचार करून आरोपींनी त्यांचा तिसरा साथीदार आकाश दराडे याच्या मार्फतीने फिर्यादी यांच्या १२ वर्षाच्या मुलाच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवुन तो खेळण्यासाठी केव्हा बाहेर पडतो याची माहिती घेवुन त्याच्या अपहरणासाठी सायंकाळची वेळ निश्चित केली. त्याप्रमाणे उक्त तिन्ही आरोपीतांनी दि. ०५/०१/२०२३ रोजी सायंकाळी ६.४५ वा. सुमारास त्यांचेकडील नंबरप्लेट नसलेल्या ओमनी कारने फिर्यादी यांच्या घराच्या बाहेर येवुन फिर्यादी यांचा १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा त्याचे इतर मित्रांसोबत गल्लीत खेळत असतांना आरोपीना संधी मिळताच त्यास त्यांनी ओमनी कारमध्ये बळजबरीने बसवून पळवून नेले आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे १) रोशन नंदु चव्हाण, व २) यश संदिप मोरे, दोन्ही रा. कानडी मळा, सिन्नर, ता.सिन्नर, जि. नाशिक यांना अटक करण्यात आली असून त्यांचा साथीदार ३) आकाश भास्कर दराडे, रा. खोपडी, ता. सिन्नर यास नुकतेच संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयात सहभागी असलेल्या इतर आरोपींच्या शोधावर पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदर मुलाचे अपहरण करण्यासाठी यातील आरोपींनी ३४,०००/- रूपये किंमतीची मारुती ओमनी कार सिन्नर येथून खरेदी केली होती. आरोपींनी सुरूवातीस सदर व्यापा-याच्या लहान मुलास पळविण्याचा बेत केला होता परंतू, तो आरडाओरड करेल या भितीने चर्चेअंती त्यांनी तो बेत रद्द करून मोठया मुलाचे अपहरण करण्याचे ठरविले.
सदर अपहरणाचे गुन्हयाचे तपासात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक . संतोष मुटकूळे, सपोनि विजय माळी, पोउनि सुदर्शन आवारी, सपोउनि रामदास धुमाळ, हरिश्चंद्र गोसावी, मिलींद इंगळे, पोहवा रघुनाथ पगारे, पोना शहाजी शिंदे, समाधान बोराडे, राहुल निरगुडे, चेतन मोरे, पंकज देवकाते, हेमंत तांबडे, रविंद्र चिने, पोकॉ किरण पवार, अंकुश दराडे, कृष्णा कोकाटे, गौरव सानप, सुशिल साळवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि सागर शिंपी, सपोउनि रविंद्र वानखेडे, पोना विनोद टिळे, पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील गुन्हयातील अपहृत मुलाची सुखरूप सुटका करून आरोपींना ताब्यात घेवुन कामगिरी केली आहे. सदर गुन्हयात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप ज्यांनी तपास पथकास १५,००० रुपये बक्षीस देवुन अभिनंदन केले आहे.