उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिकरोड : प्रतिनिधी
शहरात काही दिवसापूर्वी सावकाराच्या जाचाला कंटाळून बाप आणि दोन लेकानी आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली होती . ही घटना ताजी असतानाच शहरात पुन्हा एकदा सावकारीचा प्रताप समोर आला असून पोलिसाचा कोणताही धाक सावकारांवर नसल्याचेचित्र आहें. दरम्यान व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड केली नाही म्हणून दोघा संशयतांनी युवकाचे अपहरण करत त्यांच्याकडे तब्बल वीस लाखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर पाटील व यशवंत बागुल यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल करण्यात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी – प्रमिला जगन्नाथ पाटील (आनंद प्रेमशिल्प अपार्टमेंट, बोधले नगर) यांचा मुलगा संदीप हा स्विगीची डिलिव्हरीचे काम करतो. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास संदीप नाशिक रोड परिसरात डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकीवर गेला होता. संदीपने आईला फोन करून सांगितले की, वीस लाख रुपये जमा करून ठेव, हे लोक प्रॉपर्टी नावावर करून मागत आहेत. मला घेऊन चालले आहेत, असे सांगून संदिपने फोन बंद केला. २०२१ मध्ये संदीप हा जमीन खरेदी विक्रीचे काम करत असताना काही जणांकडून त्याने व्याजाने पैसे घेतले होते. त्याची परतफेड केली नाही म्हणून ते लोक आजपर्यंत त्रास देत आहेत. त्यांच्या जाचाला कंटाळून दीड वर्षांपूर्वी धुळ्याहून नाशिकला राहण्यास आलो. जुलै २०१९ मध्ये आमच्या सर्व कुटुंबाला पंधरा दिवस घरात डांबून ठेवले होते. २३ जुलै २०१९ रोजी धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल झाला होता. तसेच प्रमिला पाटील यांच्या कुटुंबियांनी यशवंत बागुल व त्यांच्या बारा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. देवळाली कॅम्प परिसरात राहत असताना गेल्या जुलैत गुन्हा दाखल केला म्हणून जितेंद्र उर्फ भैय्या ठाकूरने शिवीगाळ केली होती. बोधलेनगरच्या मेट्रो मॉलमागे आम्ही राहत असलेल्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील, यशवंत बागुल यांनी काही दिवसापूर्वी वॉचमनला पाटील कुटुंबियांचे फोटो दाखविले. हे कुटुंबीय कुठे जाते याबाबत चौकशी केली होती. ज्ञानेश्वर पाटील व यशवंत बागुल यांनी संदीपला पळवून नेत वीस लाखाची मागणी केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…
*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…
सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…