महाराष्ट्र

मूत्रपिंडाचा कर्करोग लक्षणे आणि उपचार

आपल्या शरीरात दोन किडनी म्हणजेच मूत्रपिंड असतात. ते आपल्या शरीरात मूत्र बनवण्याचे काम करत असतात. मूत्रविसर्जनातून आपल्या शरीरात जास्त असलेले पाणी आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. म्हणजेच ते आपल्या रक्ताच्या शुद्धीकरणाचे काम करते. याव्यतिरिक्त ते आपल्या शरीरात ऍसिड बेस यांचे नियंत्रण करणे एीूींहीेिेळशींळप सारखे हॉर्मोन हे मूत्रपिंड बनवत असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन बनण्यास मदत होते. याशिवाय रक्तदाब मर्यादित ठेवण्याचे काम हे मूत्रपिंड करत असतात. मूत्रपिंडाचा कर्करोग याची मुख्य कारणे काय आहेत. मूत्रपिंडाचा कर्करोग होण्यासाठी ठोस कारण अजून सापडले नसले तरी पुढील काही कारणे मूत्रपिंडाचा कर्करोग होण्यास कारणीभूत असतात.

 

आनुवंशिकता म्हणजे त्यांच्या घरामध्ये आई-वडील बहीण-भाऊ किंवा जवळच्या नातेवाइकांना मूत्रपिंडाचा कर्करोग आहे त्यांना मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. शरीरातील क्रोमोझोमच्या झालेल्या विशिष्ट बदलामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग उद्भवू शकतो.
धूम्रपानामुळे कर्करोग होण्याचा धोका दुप्पट होतो.
लठ्ठपणा हेसुद्धा मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय 30 पेक्षा अधिक असणे हे धोकादायक आहे. मानसिक तणाव हे सुद्धा एक मूत्रपिंडाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरलेले आहे, जे रुग्ण बरेच दिवसांपासून डायलिसिसवर आहेत. त्यांना मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. बेंजीनसारख्या केमिकलची संपर्क येणे यामुळे मूत्रपिंडाचा कर्करोगाची शक्यता वाढू शकते.उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लडप्रेशर हे सुद्धा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे कारण आहे.

 

मूत्रपिंड कर्करोगाची लक्षणे
जवळपास शंभरमधून 30 ते 40 लोकांना काहीही त्रास नसतो. पण जसजसा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो तसतशी लक्षणे वाढत जातात. जसे लघवीतून रक्त जाणे यामध्ये लघवीतून रक्त जाताना थोड्याही वेदना होत नाहीत. पोटामध्ये एका बाजूला दुखणे, पोटामध्ये एका बाजूला गाठ असल्याचे जाणवणे, भूक कमी होणे, अचानक वजन कमी होणे, लवकर थकवा जाणवणे, ताप येणे, पायांवर सूज येणे ही महत्त्वाची लक्षणे आहेत.
मूत्रपिंड कर्करोगासाठी उपचार आणि उपाय
शस्त्रक्रिया करणे ही मुख्य उपचार पद्धती आहे. यामध्ये शस्रक्रिया करून किडनीमधील घाट (ट्युमर) काढण्यात येतो. जर गाठ मोठी असेल तर मात्र शस्त्रक्रिया करून पूर्ण किडनी आणि त्या बाजूस असलेल्या लिम्फ नोडच्या गाठी काढणे गरजेचे असते. या शस्त्रक्रियेला रॅडिकल नेफरेक्टमी असे म्हणतात. जर कर्करोग हा पसरलेला असेल आणि लघवीतून रक्तस्राव खूप होत असेल तर मात्र फक्त मूत्रपिंड काढण्याचे ऑपरेशन करण्यात येते. पोटात खूप दुखत असेल तर पॅलिएटीव नेफरेक्टमी पण करता येते.

 

टार्गेटेड थेरपी यामध्ये विशिष्ट प्रकारची औषधे वापरून कर्करोगाच्या गाठीला होणारा रक्तपुरवठा थांबवला जातो आणि कर्करोगाची वाढ रोखता येते. पण अति रक्तदाब, जुलाब होणे, थकवा येणे, त्वचेवर पट्टे येणे या दुष्परिणामांमुळे रुग्ण उपचार पद्धती अर्धवट सोडण्याची शक्यता असते. इम्युनोथेरपी विशिष्ट प्रकारची औषधे वापरून कर्करोगाला नष्ट करणारी रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. जर मूत्रपिंडाचा कर्करोग हा हाडांमध्ये फुफ्फुसामध्ये किंवा मेंदूमध्ये पसरलेला असेल तर मात्र रेडिएशन थेरेपीची देण्याची गरज पडते.

 

 

डॉ. राधेश्याम चौधरी
मूत्रविकारतज्ज्ञ,
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक

हे ही वाचा :

Devyani Sonar

Recent Posts

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

1 day ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

2 days ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

2 days ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago