नाशिक शिक्षक मतदार संघात किशोर दराडे यांनी आमदारकी राखली

नाशिक शिक्षक मतदार संघात किशोर दराडे यांनी आमदारकी राखली

सलग दुसऱ्यांदा विजय आणला खेचून

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शिक्षक मतदार संघाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून, महायुती चे उमेदवार किशोर दराडे हे विजयी घोषित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे अशी तिरंगी लढत झाली. त्यात दराडे यांनी बाजी मारली. एकूण 64 हजार मतदान झाले होते. विजयासाठी31 हजारांचा कोटा ठरवण्यात आला होता. हा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यात दराडे हे विजयी झाले. विजयानंतर महायुती च्या कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.

मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये 19 व्या बाद फेरीनंतर श्री. संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. 19 व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसरा फेरी अखेर 17 हजार 393 मते पडली असून सर्वाधिक पसंती
क्रमाची 6 हजार 72 मते पडली.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा., जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल , जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक हजर होते.

अपेक्षित विजय : मंत्री दादा भुसे

नाशिक शिक्षक मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय हा अपेक्षित होता. गेल्या सहा वर्ष त्यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे. शिक्षक हे विकासाचे व्हिजन ठेवून मतदान करत असतात. भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना विकासाचे कार्य कोण करू शकते याचा विश्वास असल्याने आज आमचे उमेदवार पुन्हा विजयी झाले.  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्षकांनी विश्वास दाखवला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेवू. आ. किशोर दराडे हे येणारे 6 वर्ष शिक्षकांच्या समस्या सोडवतील हा विश्वास आहे. निवडणुकीदरम्यान अनेक वावड्या उठविण्यात आल्या मात्र सुज्ञ मतदारांनी या बाबींना थारा दिला नाही. पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात शिवसेना व महायुती अभेद्य असल्याचे अधोरेखित झाले.

– दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक

Bhagwat Udavant

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

20 hours ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

3 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

3 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

3 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

5 days ago