मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात आला. त्यांच्याकडे आता क्रीडा मंत्रालय देण्यात आले असून दत्ता भरणे यांच्याकडे कृषिमंत्री पद सोपविण्यात आले आहे. अजित पवार यांनी मंगळवारी कोकाटे यांची कान उघडणी केली होती. तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी चर्चा होती, मात्र खाते बदलण्यात येऊन तूर्तास कोकाटे यांचे मंत्रिपद कायम ठेवण्यात आले आहे