कोयत्या हल्ल्यातील जखमी समीर पठाणचा मृत्यू
नाशिकरोड : प्रतिनिधी
काही दिवसापूर्वी हप्ते वसुलीच्या कारणावरून नाशिकरोड येथील समीर पठाण याच्यावर बाळा जाधव, दिनेश जाधव याच्यासह इतर दोघे अशा चौघा जणांच्या टोळक्यानी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या पठाण याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना पठाण याचा गुरुवारी (दि.15) मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन सशयित ताब्यात असून उर्वरित एक अद्याप ही फरार आहे.