एवढी क्रुरता येते कुठून?

क्षुल्लक कारणातून खुनासारख्या घटनांत वाढ
नाशिक ः प्रतिनिधी
शहरातील धु्रवनगर येथील अवघ्या चार महिन्याच्या पोटच्या मुलीच्या गळा चिरला.सुशिक्षीत महिलेने असे विकृत कृत्य केले.दुसर्‍या घटनेत मुंबई लालबाग येथील 24 वर्षीय तरूणीने पंचावन्न वर्षीय आईची हत्या केली. अगोदर हत्येचा बनाव केला. मृतदेहाचे तुकडे केले अशी कबुली दिली. या अशा घटनांवरून एवढी क्रुरता येते कुठून असा प्रश्‍न सर्वसामान्यंाना पडला आहे.
आप्तस्वकीय एकमेकांचे जीवलग जीवाला जीव देणारे,जीव की प्राण असलेले नाते एका क्षणात विश्‍वास बसणार नाही असे कृत्य करतात. रागाच्या भरात असे कृत्य घडते किंंवा जाणीवपूर्वक केले जाते. अनेक दिवसांची धुसपूस, राग मनात ठेवून एक दिवस त्याचा विस्फोट घडतो. त्यानंतर पश्‍चातापाशिवाय हाती काही लागत नाही. आई मुलीचे नाते असो वा कोणतेचही एकमेकीचे आयुष्य पूर्ण होवू शकत नाही अशा नात्यात एकमेकींचे जीव घेण्याइतपत कोणत्या भावना दडलेल्या असतात की अशा एकमेकींचा जीव घेण्याइतपत अनावर होतात.
मानसोपचारतज्ज्ञंाच्या मते महिला असो वा पुरूष घरात असलेले ताण-तणाव,सततचा उपहास,अपमान,हार्मोनल ,मानसिक ,भावनिक त्रास असू शकतो. त्याशिवाय सोशल मीडिया ,टी,व्ही आदींवर हिंसक दृष्ये,मालिकांमधून दाखविले जातात. क्षणात एकनिष्ट असलेले नाते दुसर्‍या क्षणाला शत्रुसारखे बदललेले दाखवतात. मानसिक विकृती असल्यासारखे नातेसंबध प्रेक्षकांना बुचकाळ्यात टाकले जाते. त्यासाठी घरातील वातावरण,आर्थिक,मानसिक,भावनिक चांगले असल्यास असे प्रकार कमी घडण्यास मदत होईल.

 

अशा भयानक घटना आज काल बर्‍याच ऐकण्यात येत आहे. याच्या मागचे कारण चिडचिड राग किँवा घरात असलेले ताण-तणाव असू शकतात. महिलांना असलेले दबाव त्या व्यवस्थित मॅनेज करू शकत नाही. त्यांना ह्यात कोणाचीही मदत बराचदा नसते किँवा असलेल्या आर्थिक त्रासाला सामोरे जात असतांना असे कृत्य घडू शकते. जर एखाद्या बाईला मानसिक किंवा भावनिक त्रास असेल तर त्या मानसिक अवस्थेत ते हे कृत्य करू शकतात. जर कोणत्या बाईला हार्मोनल काही त्रास असतील तर त्यामुळे सुद्धा असे कृत्य घडू शकते. अशा वेळेस त्यांचे त्रास समजून ते ओळखून त्यांना गरजेनुसार उपचार दिला गेला पाहिजे असं झाल्यास असे कृत्य समाजात कमी होतील.
– क्रांती पुरंदरे,
आरसीआय लायसन्स क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *