नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

डॉ. अनिरुद्ध पंडित, आशिष माने, चंद्रमोहन कुलकर्णी, अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेते प्रशांत दामले, उस्ताद उस्मान खान यांचा होणार सन्मान

नाशिक : प्रतिनिधी
मराठी साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपणार्‍या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा गोदावरी गौरव पुरस्कार यंदा डॉ. अनिरुद्ध पंडित (विज्ञान), आशिष माने (साहस), चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला), अभिनेते सयाजी शिंदे (लोकसेवा), अभिनेते प्रशांत दामले (नाट्य) आणि उस्ताद उस्मान खान (संगीत) यांना जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी विज्ञान, साहस, चित्रकला, लोकसेवा, नाट्य आणि संगीत या क्षेत्रांतील सहा मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. 10 मार्च रोजी सायंकाळी रावसाहेब थोरात सभागृहात सोहळा होणार आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कवी प्रकाश होळकर पत्रकार परिषदेत म्हणाले, की साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा जपणार्‍या कुसुमाग्रजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. समाजासाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करणार्‍या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे, हेच या पुरस्कारामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. दर दोन वर्षांनी दिला जाणारा हा पुरस्कार आज केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक मानाचा सन्मान म्हणून ओळखला जातो. या सोहळ्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक पुरस्कारार्थीस 21 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. अजय निकम, अ‍ॅड. राजेंद्र डोखळे, प्रा. डॉ. दिलीप धोंडगेे (सल्लागार), लोकेश शेवडे, अ‍ॅड. विलास लोणारी आदी उपस्थित होते.

Kusumagraj Foundation’s Godavari Gaurav Award announced

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago