29 लाखांची लाच घेणाऱ्या दिनेशकुमार बागुल यांच्या घरात सापडले कोट्यवधी रुपयांचे घबाड

तीन दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या नाशिकच्या घरातून 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरी 45 लाख 40 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणांहून 1 कोटी 44 लाखांची रोकड सापडली असून काही महत्वाचे दस्त ऐवज देखील हाती लागले असल्याची माहिती सूत्रानी दिली. शिवाय अद्यापही बागूल यांच्या अनेक घरांत झाडाझडती सुरु असून पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला जात आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *