चांदवडला दहा हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
जमिनीच्या वादात आरोपीविरुद्ध जास्त कलम लावण्याच्या मोबदल्यात 20 हजारांची लाच मागितली असता पहिला हफ्ता 10 हजार रुपये स्वीकारताना चांदवड येथील पोलीस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले, हरी जाणू पालवे असे या लाचखोर हवालदाराचे नाव आहे,
तक्रारदार याचे त्यांच्या भावासोबत शेतजमिनीच्या वाहिवटी वरून वाद झाल्याने चांदवड पोलीस स्टेशन येथे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते, तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्हयात संशयित आरोपीविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपीवर कारवाई करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाच मागितली होती, त्यातील पहिला हप्ता दहा हजार स्वीकारताना हवालदार हरी जाणू पालवी (५१) यांना रंगेहाथ पकडले, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हान, राजन कदम, संतोष पावरा, रामदास बरेला, मकरंद पाटील, गायत्री पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर वाचक उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली,
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…