मागितली होती तब्बल एक लाखांची लाच
नाशिक: तब्बल एक लाख रुपयांची लाच मागून पन्नास हजार रुपये स्वीकारणाऱ्या भूमिअभिलेख उपसंचालक सह लिपीकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले, भूमिअभिलेख विभागातील क्लास वन अधिकारी च जाळ्यात अडकल्याने या विभागात चालणारी लाचखोरी ऐरणीवर आली आहे,महेश कुमार शिंदे आणि लिपिक अमोल महाजन अशी दोघं लाचखोरांची नावे आहेत, तक्रारदाराच्या 12 क्रमांकाच्या भूमिअभिलेख उताऱ्यातील नाव चुकले होते, ते दुरुस्त करण्यासाठी शिंदे या अतिरिक्त उपसंचालकाने तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी अंती50 हजार देण्याचे ठरले, याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती,पथकाने लावलेल्या सापळ्यात दोघेही अडकले, ही कारवाई अधीक्षक शर्मिला वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली,
भूमिअभिलेख विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालतात, कोणतेही काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय होत नाहीत, अशी चर्चा आहे
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…