नाशिक: अवघ्या दोनशे रुपयांची लाच मागणाऱ्या न्यायालयातील सहायक अधिक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले, तक्रारदार व त्याची पत्नी यांच्यात कौटुंबिक वाद होते, तक्रारदाराने पत्नीविरुद्ध कौटुंबीक न्यायालयात तक्रार दिलेली होती, या दाव्यात न्यायालयाने85 हजार रुपये एकरकमी खावटी देण्याचा आदेश दिला, खवटीची रक्कम जमा करण्यासाठी तारीख वाढवून मिळून देण्याच्या मोबदल्यात तक्रार दाराकडे दोनशे रुपये लाच मागितली होती, त्यानुसार दोनशे रुपये लाच देताना पथकाने रंगेहाथ पकडले, अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहलदे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन एन जाधव, दिनेश पाटील, बाळू मराठे, सुरेश पाटील, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रने श ठाकूर यांनी ही कारवाई केली