नाशिक: प्रतिनिधी
हॉटेल आणि बिअर बार चालू ठेवण्यासाठी दर महिन्याला तीन हॉटेलचा 12 हजार रुपये हफ्ता मागत त्याबदल्यात 9 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील दोघा कर्मचारी व एका खासगी एजंट अशा तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले, लोकेश संजय गायकवाड, पंडित रामभाऊ शिंदे राहणार नाशिक आणि प्रवीण साहेबराव ठोबरे राहणार निफाड या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले, पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माली, नितीन कराड, परशराम जाधव यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहलदे,नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, तक्रारदाराचे तीन हॉटेल असून प्रत्येकी चार हजार रुपये महिन्याला हफ्ता देण्याची मागणी लाचखोरांनी केली होती, त्याबदल्यात 9 हजारावर तडजोड करण्यात आली, तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती, 9 हजार स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले, तिघांना अटक करण्यात आली आहे,
मागील आठवड्यातच भूमिअभिलेख विभागातील अधिक्षकास लाच घेताना पकडण्यात आले होते,