पेट्रोल पंपावर काम करणारी महिला जखमी
इंदिरानगर: वार्ताहर
पाथर्डी गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर एका महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे., गेल्या चार महिन्यापासून जखमी महिला पाथर्डी गावाजवळील जाधव पेट्रोल पंपावर काम करत होती. घोटी येथील प्रमोद गोसावी यांचे तिच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले सहा सात महिन्यांपासून तिने प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग संशयित आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी याला आल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारे हल्ला केला. संशयित प्रमोद गोसावी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे घटनास्थळी दाखल झाले. जखमी महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. संशयित आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.