4 मार्चला लाइनमन कृतज्ञता दिवस

नाशिक : प्रतिनिधी
देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने येत्या दि. 4 मार्च रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करणेबाबत सर्व सार्वजनिक व खासगी विद्युत क्षेत्रातील आस्थापनांना सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने येत्या 4 मार्च रोजी महावितरणमध्ये लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन,वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मेचोवीस तास सेवादेतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महावितरणच्या राज्यभरातील प्रादेशिक व परिमंडलस्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमांमध्ये नियमित व बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्याहस्ते गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम आहे अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येईल. सोबतच सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आदी कार्यालय प्रमुख या कार्यक्रमास मार्गदर्शन करतील. शिवाय महिला व पुरुष लाइनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. राज्यात विविध स्तरावर 4 मार्च रोजी होणार्‍या या लाईनमन दिवस कार्यक्रमास नियमित व बाहयस्त्रोत अशा सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago