त्र्यंबकेश्वर:
श्रीक्षेत्र ञ्यंबकेश्वर येथे पौष वारी निमीत्त लाखो वारकरी भाविक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके टेकवून कुतार्थ झाले.सलग दोन वर्ष करोनाच्या संकटांने वारी झाली नाही यात्रा भरली नाही.या वर्षी मात्र दुप्पट उत्साहाने यात्रा संपन्न झाली आहे.मंगळवारी रात्री पर्यंत दिंडयांचे आगमन होत होते.जवळपास 500 दिंडया शहरात दाखल झाल्या आणि दशमीच्या रात्रीला ब्रह्मगिरीला जाग आली.हारीनामाने अवघा परिसर दुमदुमला.जागा मिळेल तेथे दिंडयाच्या राहुटया उभारल्या आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात हरिनामाचा गजर होत राहीला.कुशावर्तावर स्नान करत मंगळवारी रात्री पासूनच वारकरी दर्शनबारीत उभे राहीले.काही ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला गेले तर काही सकाळी ब्रह्मगिरी पर्वतावर पोहचले.ञ्यंबक नगरी दोन दिवसांपासून भक्तीरसात नाहून निघाली आहे.