filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; module: photo; hw-remosaic: false; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: 2621440; cct_value: 5409; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 70.0; aec_lux_index: 0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0; albedo: ; confidence: ; motionLevel: 0; weatherinfo: null; temperature: 39;
सप्तशृंगगडावर हजारो कावडधारकांसह तृतीयपंथीयांचा मेळावा
सप्तशृंगगड : वार्ताहर
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता कावडधारकांसह तृतीयपंथीय व भाविकांना कोजागरी पौर्णिमेची आस लागली होती. त्यानिमित्त सप्तशृंगगडावर हजारो कावडधारक व तृतीयपंथीयांचे आगमन झाले आहे. कोजागरी पौर्णिमेला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व इतर ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात कावडधारक येतात. तसेच छबिना उत्सवासाठी लाखो भक्त हजेरी लावतात.
नवरात्रोत्सवाप्रमाणेच सप्तशृंगगडावर कावडधारकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहेत. सप्तशृंगगडावर विविध नद्यांचे जल घेऊन आई भगवतीला जलाचा महाअभिषेक केला जातो. यात पुणे येथील मुळा नदीचे जल, साक्री-पिंपळनेर येथून तापी नदीचे, ओंकारेश्वर उज्जैन-इंदूर येथून नर्मदेचे, भीमाशंकर येथून भीमा नदीचे, त्र्यंबकेश्वर-नाशिक येथून गोदावरीचे व भारतातील विविध ठिकाणांवरून कावडधारक पायी पवित्र जल सप्तशृंगगडावर घेऊन येतात. कावडधारक चारशे ते पाचशे किलोमीटर उन्हात पायी सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी येतात. रस्त्यावर ठिकठिकाणी कावडधारकांसाठी दानशूर व्यक्तींकडून फराळासह पिण्याचे पाणी, चहाचे वाटप केले जाते. सप्तशृंगगडावर येणार्या भक्तांसाठी विविध संस्थांकडून दूध, चहा आदींची व्यवस्था केली जाते.
सप्तशृंगगडावर नांदुरी ते सप्तशृंगगड दरम्यान एसटीची व्यवस्था केलेली आहे. मंदिरात दुरून येणारे कावडधारकांकडून पवित्र जल घेण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तसेच प्रशासनातर्फे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोजागरीला रात्री अकराला भगवतीला पंचामृतासह आणलेल्या पवित्र विविध नद्यांच्या जलाने अभिषेक केला जातो. कोजागरी सोमवारी व मंगळवारी असल्याने गडावर मोठ्या प्रमाणात कावडधारकांसह भाविकांची गर्दी झाली आहे.
कोजागरीेनिमित्त दोन दिवस विधी
सोमवारी (ता. 6) (पौर्णिमा प्रारंभ दुपारी 12.23 मि.) सकाळी 7 ला पंचामृत महापूजा. दुपारी 12.30 ते रात्री 8.30 ला कावडीधारकांनी आणलेले जल श्रीभगवती मंदिरात स्वीकारले जाते. रात्री 8.30 ते 12 दरम्यान श्री भगवतीचा जलाभिषेक पंचामृत महापूजा, रात्री 12 ला श्री भगवती महाआरती. मंगळवारी (ता. 7) : सकाळी 7 ला देवी पंचामृत महापूजा (कोजागरी पौर्णिमा समाप्ती सकाळी 9.17 मि.). बुधवारी (ता. 8) सकाळी 7 ला पंचामृत महापूजा. सायंकाळी 7.30 ला शांतिपाठानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.
पारंपरिक वाद्यांचा गजर
कावडधारकांसह तृतीयपंथीयदेखील मोठ्या संख्येने सप्तशृंगगडावर येत असतात. त्यांचाही मेळावा भरतोे. त्याअनुषंगाने सप्तशृंगगडावर तृतीयपंथी दाखल झाले आहेत. कोजागरी पौर्णिमेनिमित्त तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव साजरा करण्यात येत आहे. ज्यामध्ये देवीचा छबिना पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येतो आणि त्यात तृतीयपंथी सहभागी होऊन मिरवणुकीला शोभा आणतात. हा उत्सव सामाजिक एकात्मता आणि लोकसंस्कृतीचे प्रतीक असून, हजारो भाविक सोहळ्यासाठी गडावर उपस्थित असतात.
जादा बसेसचे नियोजन
सोमवारी (दि. 6) व मंगळवारी (ता. 7) नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येईल. महामंडळानेही नवरात्राप्रमाणेच नांदुरी ते सप्तशृंगगडादरम्यान 130 बसेस, तर नाशिक विभागातील 11 आगारांतून सुमारे 250 बसेसद्वारे नियोजन केले आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…