सहलीसाठी लालपरी लई भारी
शाळांची पसंती: एसटीला मिळाले दीड कोटींचे उत्पन्न
नाशिक : प्रतिनिधी
हिवाळ्याच्या हंगामात शाळा, महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि भौगोलिक गोष्टींचे ज्ञान मिळावे म्हणून सहलींचे आयोजन करण्यात येते. सहलीसाठी खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा एसटी महामंडळाच्या बसेसला शाळांची पसंती मिळत असल्याने डिसेंबर महिन्यात एसटी महामंडळाला सहलींमुळे एक कोटी 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
डिसेंबर महिन्यात तब्बल 1361 बसेसचे बुकिंग करण्यात आले होते. दररोज सरासरी 44 बसेस धावल्या. त्याद्वारे एसटी महामंडळाला एकूण एक कोटीच्या वर उत्पन्न मिळाले. एसटी महामहामंडळाला कोरोना काळात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. संपामुळे चार महिने एसटी बंदच होती. एसटीने उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना राबविल्या. आता मात्र, एसटीने टॉप गिअर टाकला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सहलीसाठी विद्यार्थ्यांना बाहेर नेतांना विद्यार्थ्यांची जबाबदारी महत्वाची असते. कोरोनामुळे दोन वर्षे शालेय विद्यार्थ्यांच्या सहली काढण्यात आल्या नव्हत्या. जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर शाळांनी सहलीचे आयोजन केले आहे. धार्मिक पौराणिक ठिकाणे वास्तु पर्यटन स्थळांवर विद्यार्थ्याना इतर माहिती मिळावी यासाठी सहलींचे आयोजन करण्यात येते. सहलीचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी एसटी महामंडळाला पसंती दिली आहे. सहलीसाठी शाळा महाविद्यालयांना 50 टक्के सवलत दिली जाते. उर्वरित रक्कम राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभागाकडून महामंडळाला दिली जाते.
खासगी ट्रॅव्हल्ससारखी आरामदायी शिवशाही बस असून त्यांना सहलीसाठी सवलत देण्यात येत नाही. परिणामी साध्या बसेस बुक करण्यात येतात. सहलींसाठी शालेय शिक्षण विभागाने अटी शर्ती निश्चित केल्या आहेत .त्यामुळे एसटी बसने सहली नेण्याचे बंधन घालण्यात आले आहे.त्यामुळे यावर्षी सहलींद्वारे महमंडळाला कोटींचे उड्डाणे घेणे शक्य होत आहे.
विद्यार्थ्यांना भौगोलिक गोष्टींचे ज्ञान सहलीच्या माध्यमातून मिळावे, या हेतूने आयोजन केले जाते. ऐतिहासिक स्थळांना सहलीसाठी प्राधान्य दिले जाते. धार्मिक आणि नवीन तंत्रज्ञानाची ठिकाणे विद्यार्थ्यांना दाखविली जातात.
बाळासाहेब सोनवणे, नाशिक
या स्थळांना पसंती
वेरुळ, अंजिठा, औरंगाबाद, शिवनेरी, रायगड, मुरुड, जंजिरा, अलिबाग, गणपती पुळे, लेण्याद्री
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…