नाशिक

लालपरीचा अमृतमहोत्सव

लालपरीचा अमृतमहोत्सव

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या एसटीचा आज म्हणजे 1 जूनला 74 वा वाढदिवस आहे. 1 जून 1948 रोजी पुणे – नगर या मार्गावर पहिली एसटी धावली होती. आज एसटी महामंडळाचा विस्तार झाला आहे. गाव तेथे एसटी, रस्ता तिथे एसटी या ब्रीदवाक्यनुसार एसटीचा विस्तार होत गेला. गावागावात आज एसटी पोहचली आहे. त्याचप्रमाणे एसटी तर्फे आंतरराज्यीय सेवा देखील पुरवली जातेय. कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात आज एसटी पोहचली आहे. एकूण 31 विभागातून एसटीचे कामकाज केले जाते. साधारणपणे 18 हजार विविध प्रकारच्या बसेस, लाखांच्या आसपास कर्मचारी, 65 लाख किलोमीटरचा रोजचा प्रवास, 609 बसस्थानके, 250 स्वतंत्र डेपो, 3374 मार्गस्थ थांबे, 22 कोटींचे रोजचे उत्पन्न हा एसटीचा कारभार अचंबित करणारा आहे. राज्यातील कोट्यवधी प्रवाशांच्या लाडक्या लालपरीने काळानुसार कात टाकली असून, अनेक बदलही केले आहेत. लालपरीपासून हिरकणी, शिवनेरी, शिवशाही आता विठाई असा एसटीचा चेहरामोहरा बदलत गेला आहे.

आज एसटीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आरामदायी गाड्या आहेत. वातानुकूलित, बिगर वातानुकूलित अशाही गाड्या आहेत. एसटीने समाजातील जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वातंत्र्य सेनानी, अपंग, पत्रकार, आजारी व्यक्ती यांना तिकीट दरात सवलती दिल्या आहेत. एसटीने सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना काळात रस्त्यावर आपत्कालीन व्यवस्था सांभाळली आहे. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक एव्हढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी सांभाळली आहे. खेड्यापासून शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हक्काचे वाहन म्हणजे एसटीच. ग्रामीण भागातील करोडो विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ एसटीमुळेच पूर्ण होऊ शकले म्हणूनच राज्यातील करोडो प्रवाशांच्या मनात एसटी विषयी आदराची भावना आहे. मागील दोन वर्ष प्रवाशांच्या या लाडक्या लालपरीला कोणाची तरी नजर लागली. कोरोनामुळे जवळपास दोन वर्ष एसटीचे चाक आगरातच रुतून बसले होते. कोरोना कमी होताच कर्मचार्‍यांच्या संपाचे दुष्टचक्र एसटी च्या मागे लागले त्यामुळे एसटीचे उत्पन्न कमालीचे घटले. एसटी महामंडळाची आर्थिक घडी बिघडली. आता मात्र पुन्हा नव्या दमाने एसटी रस्त्यांवर धावताना दिसत आहे. प्रवासीही पूर्वीप्रमाणेच आपल्या लाडक्या लालपरीत बसून प्रवास करीत आहेत. एसटी ला पुन्हा पूर्वीचे दिवस येत आहे त्यामुळे चालक, वाहक आणि प्रवाशांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील प्रवाशांच्या मनात मानाचे स्थान असलेल्या, सर्वांच्या लाडक्या लालपरीला म्हणजेच एसटीला 74 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

Ashvini Pande

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

2 hours ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 hours ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

13 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

20 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

21 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

21 hours ago