नाशिक : प्रतिनिधी
वर्षभरात घरगुती हिंसेच्या तब्बल 856 तक्रारी !
पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात काल मालेगावच्या न्यायालयात हजर झालेल्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मालेगावच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणी आता 3 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
प्रकाश आंबेडकरांना अटक करुन दाखवाच वंचितचे महानगर प्रमुख अविनाश शिंदेचे राणे यांना खुले आव्हान
गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी बदनामी केल्याच्या कारणावरुन मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेल्या दाव्यात खा. राऊत आतापर्यंत दोनदा न्यायालयात गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना वॉँरट काढले होते. राऊत काल शनिवारी न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या आवारात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाढोलीचा ग्रामसेवक एक लाखाची लाच घेताना जाळ्यात
हिसाब तो देना पडेगा
सुनावणी संपल्यानंतर खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना संविधानाने मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. असे म्हणत पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर तोफ डागली. गिरणा सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली दादा भुसे यांनी 178 कोटी रुपये जमा केले होते. त्याचा हिशेब आम्ही मागत आहोत.
भुजबळ गो बॅक घोषणा देत कोटमगाव येथे मराठा समाजाने भुजबळांना घेरले
हिशेब मागीतला तर आम्ही गुन्हेगार झालो का? त्यांचीच टॅग लाइन आहे ना, हिसाब तो देना पडेगा. आता आम्ही मागीतला तर आम्ही गुन्हेगार कसे झालो. संविधान, नियम आम्हालाही माहित आहे.खटला दाखल केल्याने मी न्यायालयात आलो. आम्ही काय घाबरतो का? काही जण नोटीस आल्यावर दुसर्या पक्षात पळून गेले. मालेगावचा लढवय्या योद्धा अद्वय हिरे तुरुंगात आहे. मालेगावचा आगामी आमदार हा आमचा असेल त्यामुळे मला आता कायम यावेच लागेल, असेही राऊत म्हणाले.