कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ
नाशिक: प्रतिनिधी
मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात 8 हजारांची लाच मागून 3 हजार स्वीकारताना कळवण येथील भूमापन लिपिक विजय हनुमंत गवळी वय43,रा.नम्रता रो हाऊस, नंबर 4,वरदनगर, म्हसरूळ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांनी विक्री केलेल्या वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीचा वाद सह दिवाणी न्यायाधीश कळवण यांच्या न्यायालयात 2022 पासून चालू होता. न्यायालयाने यातील वादी व प्रतिवादी यांचे गट क्रमांक 168 ची मोजणी करून अहवाल सादर करणेबाबत तालुका अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कळवण यांना आदेशीत केले होते. सदर गट विषयाची मोजणी 21 मे रोजी गवळी यांनी केली होती. त्याबाबतचा अहवाल उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे सादर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 8 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 3 हजार अहवाल सादर करण्या पूर्वी आणि उर्वरित अहवाल सादर झाल्यानंतर द्यावे, असे ठरले होते, याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उपअधीक्षक संतोष पैलकर, हवालदार दिनेश खैरनार, प्रफुल्ल माळी, अविनाश पवार यांनी लाच घेताना गवळी यास रंगेहाथ पकडले. अधिक तपास अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *