साडेतीन लाखांची लाच घेताना भूमिअभिलेखचा शिपाई जाळ्यात
निफाड येथे लाचलुचपतची कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
जमिनीच्या हद्दी खुणा दाखवून नकाशा काढून देण्याच्या मोबदल्यात भूमिअभिलेखचे अधीक्षक आणि स्वत:साठी चार लाखांची लाच मागून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना भूमिअभिलेखच्या शिपायास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नितेंद्र काशिनाथ गाढे रा. निफाड असे या शिपायाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मावशीची मौजे दीक्षी तालुका निफाड येथे शेतजमीन असून, ही शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक 25 जानेवारीला अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या जमिनीची भूमि अभिलेख कार्यालय यांच्यामार्फत दिनांक 28 फेब्रुवारीला मोजणी झाली होती परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या. शिपाई गाढे यांनी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक भाबड यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड यांच्याशी बोलून हे काम दिलेल्या तारखेस दिनांक 07.मार्च 2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दिनांक 06 मार्च रोजी स्वतःसाठी व भाबड यांच्या नावे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती साडेतीन लाखांवर तडजोड केली. याबाबत तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला असता या लाचेची रक्कम काल स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.पोलीस निरीक्षक मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकरघारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…