३५ हजारांची लाच स्वीकारताना भूकर मापक  जेरबंद

३५ हजारांची लाच स्वीकारताना भूकर मापक  जेरबंद
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नाशिकमध्ये कारवाई
नाशिक प्रतिनिधी
भूमी अभिलेख कार्यालय, निफाड येथील भूकर मापकाने हद्द कायम जमीन मोजणीचा नकाशा देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी करण्यात आली.
दिनेश शिवनाथ झुंजारे (वय ४२), पद – भूकर मापक (वर्ग ३), कार्यालय – उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, निफाड, रा. तिरुपती रो-हाऊस नं. १, टागोर नगर, आंबेडकर नगरजवळ, उपनगर, नाशिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *