नाशिक

कसारा घाटात दरड कोसळली

वाहतूक एकेरी मार्गाने सुरळीत सुरू

इगतपुरी : प्रतिनिधी
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात काल सकाळी दरड कोसळल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ एकेरी मार्गाने सुरू होती.
मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात झीरो पॉइंट वळणावर मोठे झाड व दगड, मातीचा मलबा खाली महामार्गावर कोसळल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक काही वेळ एकेरी मार्गाने सुरू होती.
दरम्यान, घाटात दरड व मातीचा मलबा पडल्याचे समजताच आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी मलबा दूर केला व वाहतुकीला येणारा अडथळा दूर केला. त्यानंतर पडलेले महाकाय झाड मुंबई-नाशिक एक्स्प्रेस वेच्या आयएचपीएल कंपनीकडून जेसीबीच्या मदतीने बाजूला करण्यात आले. दरम्यान, सतत कोसळणार्‍या पावसामुळे नवीन व जुन्या कसारा घाटातील दरडी कोसळण्याचा धोका
वाढला आहे.
दरम्यान, कसारा घाटातील संरक्षक कठडे, रस्ते व अन्य काम करणार्‍या पोट ठेकेदाराने एक महिन्यापूर्वी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्ता पूर्णपणे उखडला असून, नुकतेच दुरुस्ती केलेले संरक्षक कठडेदेखील तुटले आहेत. परिणामी, घाटात मोठ्याप्रमाणात धुके असते. त्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

रोड रिसर्चचे आदेश धाब्यावर

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात दरड व मातीचा मलबा कोणत्याही क्षणी कोसळून हानी होण्याची शक्यता असल्याचा अहवाल 10 वर्षांपूर्वी दिल्लीच्या रोड रिसर्च सेंटरच्या टीमने नॅशनल हायवे अथॉरटी व ठेकेदार कंपनीला दिला होता. त्यासाठी घाटात रोलिंग जाळ्या बसवण्यात याव्यात, अशा सूचना पण केल्या होत्या. परंतु नॅशनल हायवे अथॉरिटीने त्याकडे दुर्लक्ष केले.

 

Gavkari Admin

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

4 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

9 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

9 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

10 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

10 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

10 hours ago