इगतपुरी ते कसारादरम्यान पावसामुळे दरड कोसळली

इगतपुरी/शहापूर : प्रतिनिधी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारादरम्यान चॅनल नंबर 636 या ठिकाणी बोगद्याच्या पुढे मुंबई वाहिनीवर मंगळवारी रात्री 7.35च्या दरम्यान दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटांत विस्कळित झाली. दोन दिवसांपासून कोसळणार्‍या सततच्या पावसामुळे समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्याजवळ मातीचा मलबा व महाकाय दरड रस्त्यावर कोसळली. यादरम्यान सुदैवाने कोणत्याही प्रकारची वाहने रस्त्यावर नसल्याने दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील यंत्रणेने जेसीबी व हायड्रा क्रेनच्या मदतीने महामार्गावरील दरड व मातीचा मलबा दूर करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्ग पोलीस अधिकारी छाया कांबळे यांनी धाव घेतली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *