लासलगाव पोलिसांनी पकडला २ लाख रुपयांचा ४० किलो गांजा
संशयित गाडी टाकून फरार, लासलगावी गुन्हा दाखल
लासलगाव:-प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथे लासलगाव पोलिसांनी एका चार चाकी गाडीतून दोन लाख रुपये किमतीचा सुमारे ४० किलो गांजा व २ लाख रुपये किमतीची टाटा एस गाडी जप्त केली असून या गुन्ह्यातील संशयित फरार झाला आहे या संदर्भात लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथक व लासलगाव पोलिसांनी संयुक्तिक ही कारवाई केली आहे.
लासलगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की
स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांचे पथक सोमवारी रात्री उशिरा निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथील नांदूर मधमेश्वर रस्त्यावर अशोक नागरे यांच्या शेतातील शेड च्या जवळ असलेल्या टाटा कंपनीच्या मालवाहतूक एस गाडी नंबर एम एच १३ सी जे ०५१३ या गाडी च्या मागावर होते. या गाडीमध्ये १६ प्लास्टिक बॅगमध्ये अंदाजे ४० किलो गांजा ठेवण्यात आलेला होता व त्याची वाहतूक सुरू होती. या गुन्ह्यातील संशयित संदीप रामनाथ सानप रा. सिन्नर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पोलिसांनी २ लाख रुपयांचा गांजा व २ लाख रुपयाचे वाहन असे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…